“मराठी माणसाने मोठी महत्त्वाकांक्षा ठेवली नाही, तर दिल्लीवर मराठी प्रभाव प्रस्थापित करणं कठीणच आहे.” - पृथ्वीराज चव्हाण
मराठी माणसाचा कमी समाधान मानणारा स्वभाव मोठा अडसर आहे. मधु दंडवते, विदर्भातील काही मोठे नेते, यांनी दिल्लीत खूप चांगलं काम केलं होतं, पण नंतर संगीत खुर्चीचा खेळ झाला आणि ते राजकारणातून बाजूला झाले. हीच मराठी माणसांची एक मोठी समस्या आहे. त्यांना मिळालेल्या स्थानावर समाधानी राहण्याची सवय आहे, पण मोठी महत्त्वाकांक्षा ठेवली नाही, तर दिल्लीवर मराठी प्रभाव प्रस्थापित करणं कठीणच आहे.......